नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केलं म्हणून तिच्या भावाने तरूणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकचं नव्हे तर या मारहाणीमध्ये त्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नसीम शहा असं मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
बहिणीला प्रपोज का करतो? असं विचारत तरूणाला मारहाण करण्यात आली यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. बहिणीच्या भावाने त्याच्या साथीदारासह तरूणाला मारहाण केली. नाशिकच्या गंगापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.