पालघरच्या डहाणूमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात मुलीची आईकडून हत्या करण्यात आली आहे. चौथ्यांदा मुलगी झाल्याने आईनेच लेकीची हत्या केल्याचं उघडकीस झाल आहे.चौथी अपत्य देखील मुलगी झाल्याने नकोशी झालेल्या नवजात मुलीची आईने नाक तोंड दाबून हत्या केली आहे.
पालघरच्या डहाणू लोणीपाडामध्ये कोलकत्याहून आपल्या माहेरी आलेल्या पुनम शहा या निर्दयी आईकडून दोन दिवसांच्या नवजात चिमुकलीची हत्या. नाकावर आणि तोंडावर हात देऊन श्वास रोखून मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान डहाणू पोलीस ठाण्यात आरोपी पुनम शहा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला असून, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच डहाणू पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.