सध्या राज्यात बांगलादेशींचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अस असताना देखील बांगलादेशी सीमा ओलांडून भारतात येत आहेत. तर दुसरीकडे राज्यात महिलांवर होणारे अत्याचार देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेकदा आपण ऐकलं असेल की महिलांची त्यांच्याच जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक करुन त्यांना वेश्या व्यवसायात आणलं जात.
त्यांना नोकरीचं, शिक्षणाचं तसेच लग्नाचं आदींची कारण देऊन महिलांचा गैरफायदा घेण्यात येतो. या महिला इतर राज्यात तसेच देशातून आणल्या जातात. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील बुधवार पेठेत घडला आहे. पुण्यात एका मुलीला तिच्याच मैत्रिणीने बांगलादेश मधून भारतात आणलं आणि तिला काही पैशांसाठी पुण्यातील बुधवार पेठेत विकलं असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
पुण्यातील बुधवार पेठ हा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी असलेल्या महिला या बांगलादेशी असल्याचं म्हटलं जात आहे. याच पुण्याच्या बुधवार पेठेत 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना बुधवार पेठेत एका महिलेजवळ विकले. त्या अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने बांगलादेशची सीमा नदीमार्गे बेकायदेशीरपणे ओलांडून भारतात आणलं. त्यानंतर त्या दोघी भोसरी भागात राहिल्या त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे लाखो रुपयांना विकले.
यानंतर त्या अल्पवयीन मुलीला बुधवार पेठेतील कोठेवालीकडून सांगण्यात आलं की, "तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील". अशी धमकी देत तिला बजावण्यात आलं. तिला पाच महिने बंद खोलीत ठेवून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आला. तिच्यावर तब्बल पाच महिने अत्याचार करत तिला वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात आलं.
अखेर तिने योग्य संधीचा फायदा घेत त्या नरकातून 7 एप्रिल रोजी पळ काढला. त्यानंतर ती कसे तरी प्रयत्न करत हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसांकडे संपर्क साधला. दरम्यान या संबंधी पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल केला तसेच एका एका महिलेला अटक केली आहे.