JOB LOSS TRIGGERS MENTAL STRESS; SOFTWARE ENGINEER DIES IN FARIDABAD TRAIN INCIDENT 
Crime

Crime News: नोकरी गेल्यानंतर मानसिक तणावात वाढ; सॉफ्टवेअर इंजिनिअरने ट्रेनसमोर मारली उडी

Faridabad News: फरीदाबादमध्ये नोकरी गेल्यानंतर मानसिक तणावात असलेल्या ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा रेल्वेजवळ मृत्यू झाला.

Published by : Dhanshree Shintre

फरीदाबादमध्ये नोकरी गेल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर विक्रमजीत सिंग याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तो आई सुमन हसोबत सेक्टर १० मध्ये राहत होता आणि एका महिन्यापूर्वी खाजगी कंपनीतील नोकरी सोडावी लागली होती.

शनिवार सकाळी न्यू टाउन आणि ओल्ड रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. स्टेशन मास्तरने ट्रेनसमोर व्यक्ती उडी मारल्याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेह रुळांवर आढळला. जॅकेटमधून सापडलेल्या मोबाईलवरून ओळख पटली आणि आई सुमन यांचा फोन आला.

सुमन यांनी पोलिसांना सांगितले की, नोकरी गेल्यापासून मुलगा तणावात होता. शुक्रवारी रात्री जेवणादरम्यान त्याने आत्महत्येच्या पद्धतींबद्दल चर्चा केली. आईने समजावून सांगितले तरी तो ऐकलाच नाही. फिरायला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडला आणि परतलाच नाही.

विवाहित नसलेल्या विक्रमजीत घरून काम करत होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, नोकरीतील दबावामुळे अशी पायरी उचलल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा