(Amravati ) अमरावतीत धक्कादायक घटना घडली आहे. रिसेप्शनमध्येच नवरदेवावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला. माताफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे याचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडत होता.
रात्रीच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन संशयित व्यक्ती स्टेजवर पोहोचले. त्यांनी अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली आहे. काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते आरोपी पळून गेले.
या घटनेनंतर आरडाओरड सुरू झाली. नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हा हल्ला नेमका का करण्यात आला. याची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे.