लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. तात्काळ त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रुमकडे धाव घेत त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता स्वतःच्या पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या.
त्यांच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेण्याचे नेमकं काय कारण? हे मात्र अद्याप समजलं नाही आहे.