दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर आता मध्य प्रदेशमध्ये श्रद्धा हत्याकांड 2.0 असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील दमोह येथे एका तरुणाने 10 महिन्यांपूर्वी त्याच्या लिव्ह-इन प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. तसेच, या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या करणारा तरुण तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.
प्रेयसी त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. यामुळे आरोपी संयाजने नाराज होऊन असे पाऊल उचलले. आरोपी संजयने 10 महिन्यांपूर्वी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली होती आणि तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवून पळून गेला होता. पोलिसांनी आरोपी संजय पाटीदारला उज्जैन येथून अटक केली आहे.
पोलिसांच्या चौकशीनंतर असं समोर आलं की, जुलै 2023 मध्ये आरोपी संजय पाटीदार हा मध्य प्रदेश येथील दमोह येथे भाड्याने राहत होता. यानंतर शेजाऱ्यांनी सांगितले की, मार्च 2024 पासून प्रतिभाला कोणीही पाहिले नव्हते. शेजारी विचारल्यावर संजय सांगायचा की पिंकी तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, प्रतिभा प्रजापती ही उज्जैनमधील संजय पाटीदार यांच्यासोबत घरात राहत होती. त्यानंतर त्याने 2024 मध्ये घर रिकामे केल आणि त्यावेळेस घरमालकाला सांगितले होते की, माझे काही सामान या खोलीत ठेवले आहे, त्यामध्ये फ्रीज देखील आहे. शहरातील वीज गेल्यानंतर खोलीतून दुर्गंधी येत असताना ही हत्या उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.