नागपुरातील हिंसाचाराचे आता पडसाद उमटताना दिसत आहेत. यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेदरम्यान या प्रकरणाबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी नागपूर येथील घटनेचा आढावा घेऊन त्याबद्दलची माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागपूरमध्ये FRPF च्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी सर्व आयुक्त आणि आधीक्षकांची व्हिडीओ कॉलद्वारे बैठक घेतली. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याचेदेखील आदेश दिले आहेत". दरम्यान हे सर्व पूर्वनियोजित असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हिंसाचाराप्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गाडी भरून दगड होला करुन ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे ठरवून काही घरांना व कार्यालयांना लक्ष्य केले गेले. तीन डिसीपी स्तरावरील पोलिस अधिकाऱ्यांच्या घरवारदेखील हल्ले केले असून एका डिसीपीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. पण ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले आहेत त्यांना सोडणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्व समाजाचे धार्मिक सण सध्या सुरु आहेत. सर्वांनी संयम ठेवला पाहिजे. मी कोणत्याही चित्रपटाला दोष देत नाही".
'छावा' चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला. त्यामुळे आता औरंगजेबाबाबतचा राग बाहेर येत आहे. पण यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत. याची सगळ्यांची जबाबदारी आहे.दंगा करण्याचा प्रयत्न केला, तर जात व धर्म न पाहता कारवाई केली जाईल. पोलिसांवर हल्ला करतील त्यांना सोडले जाणार नाही