MALAD SCHOOL ABUSE CASE 2026 | GUARD AND CEO BOOKED UNDER POCSO & IPC SECTIONS 
Crime

Mumbai Crime: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुनरावृत्ती, शाळेतील शिपायाकडून 5 वर्षांच्या चिमुकलीवर गैरवर्तन

Malad School Abuse: मालाडमधील शाळेत पाच वर्षांच्या मुलीसोबत शिपायाच्या गैरवर्तनाचा गंभीर आरोप. पालकांनी तक्रार केली; पोलीसांनी शिपाई अनिल पांचाळ व शाळेचे सीईओ अनंत यज्ञीक यांच्याविरुद्ध POCSO व IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

बदलापूर येथील धक्कादायक घटनेची आठवण करून देणारा प्रकार मालाड परिसरात समोर आला आहे. मालाडमधील एका शाळेत पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत शाळेतील शिपायाने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिपायाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरकृत्य केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या पालकांनी तत्काळ शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, आरोपीबाबत स्पष्ट माहिती देण्यास शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

इतकेच नव्हे तर, शाळेची बदनामी होऊ नये या हेतूने शाळेच्या सीईओंनी प्रकरण बाहेर जाऊ नये म्हणून मुलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचे सीईओ अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 74, 351(2)तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 मधील कलम 10, 17 आणि 21(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • मालाड शाळेतील शिपायाने पाच वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप

  • पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलीस कारवाई, FIR नोंदवली

  • शाळेचे सीईओ प्रकरण बाहेर निघू नये म्हणून दबाव; दोघांविरुद्ध गुन्हा

  • POCSO 2012 आणि IPC कलमांतर्गत दोषींवर कडक कारवाई केली जाणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा