मुंबई महानगर पालिका हि आशिया खंडातील श्रीमंत महानगर पालिकांच्या यादीत येते पण याच महानगरपालिकेच्या घाटकोपर येतील राजावाडी रूग्णालयात काही दिवसापुर्वी रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याने पाहीला मिळाले. काल त्याच रुग्णाचा दुरदैवी मृत्यू झाला.
बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयातिय भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आला.दरवर्षी करोडो रूपयांचा बजेट येऊन पण रूग्णाला असुविधांचा सामना करावा लागतो अशी तक्रार नागरिकांनकडून होत आहे. याप्रकरणावरुन आम आदमी पार्टीच्या स्थानिक नेत्या प्रीती मेनन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आपच्या कार्यकर्त्यांनी या वेळी रुग्णालय प्रशासनानाशी ही बातचीत केली.तर या बाबत त्यांनी राजावाडी रूग्णालयच्या बाहेर काळे झेंडे आणि फलक घेऊन निदर्शने केली.या बाबत कठोर कारवाई व्हावी, रुग्णाच्या नातेवाईकांना भरपाई मिळावी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळी आप ने केली आहे.