Crime

Mumbai Crime | आरे कॉलनीजवळील पार्किंगमध्ये ४८ जिवंत काडतुस

Published by : Lokshahi News

मुंबईतील हक्काचे नैसर्गिक ठिकाण ज्याला मुंबईचा ह्रदय म्हंटले जाते त्या आरे कॉलणीचा वापर गुन्हे लपवण्यासाठी गुन्हेगार करत असल्याचे दिसते.

मुंबईच्या आरे कॉलणीत आरे दुध वसाहत असलल्या भागात उभ्या असलेल्या कारमध्ये ४८ जिवंत कारतुस सापड्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

सापडलेली कारतुसे ०.२ मिमी प्रकारची असुन ति कारतुसे कोणी सोडली, का सोडली? याची माहीती अद्यापही उघडकीस आली नाही. सदर घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व कारतुसे जप्त केली आहे.

स्थानिक पोलीस अधिकारी प्रसाद पिटले परिसरातील सीसीटीव्हीत काही संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा तपास करत आहेत. हा पार्किंग परिसर गजबजलेला असल्याने या ठिकाणी बऱ्याच लोकांनी ये-जा केली आहे. त्यामुळे संबंधित काडतुसे नेमकी कोणी ठेवली हे शोधण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.

सध्या पोलिसांकडून पार्किंग परिसरात तैनात सुरक्षा रक्षक आणि काडतुसे पाहिलेल्या अन्य साक्षीदारांचे जाब नोंदवून घेण्यात येत आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा