Crime

मुंबई पोलिसांनी कांदिवलीतून चोरलेले सोने गुजरातमधून केले जप्त

Published by : Lokshahi News

मुंबईच्या कांदिवली पोलिसात सोनसाखळी चोरीचे असेच एक प्रकरण उकलण्यात आले आहे. ज्यामध्ये आरोपींनी मुंबईतून सोने चोरून गुजरातमध्ये नेले होते आणि ते जमिन खोदून लपवून ठेवले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेतील एक जोडपे 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत इतर ठिकाणी राहायला गेले होते. त्यांनी त्यांच्या घराची दुरुस्ती आणि संपूर्ण घरात फरशा बसवण्याचे काम दोन लोकांना दिले.

आरोपींनी 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान लाखोंचे सोने चोरले ते गुजरातमधील एका गावात नेले आणि जमिनीखाली पुरले, आणि नंतर मुंबईला परत आले आणि घरातील कामे करण्यास सुरुवात केली. घराचे काम आटोपताच 22 तारखेला जेव्हा पीडित शंकर शीना पुजारी घरी आली तेव्हा त्याने पाहिले की घरातून लाखोंचे सोने गायब आहे.

पीडितेने याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. तपासादरम्यान, पोलिसांनी घरात काम करणाऱ्या एका मजुराला पकडले आणि चौकशी केली असता त्याने सांगितले की हे सोने घरात काम करणाऱ्या दोन्ही मजुरांनी मिळून चोरले होते. घटनेची माहिती मिळताच कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या शोध पथकाने आरोपींना गुजरातमध्ये नेले आणि सोने जप्त केले.

पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींकडून 4,57,306 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दिलीप परमार आणि पंकज कुमार केशरीया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, हे दोघेही मजूर म्हणून काम करतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी