नागपूरमध्ये 50 वर्षीय महिला डॉक्टर डॉ. अर्चना राहुले यांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मेडिकल मधील फिजीओथेरपी विभागातील सहाय्यक प्राध्यापिकेचा हत्या प्रकरणाचा उलघडा झाला आहे. मृतक प्राध्यापीकेचा पतीच तिचा मारेकरी निघाला. डॉ. अनिल राहुले असे आरोपी पतीचे नाव असून पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून त्याने भावाच्या मदतीने हत्या केल्याची त्याने पोलिसांना कबुली दिली आहे.
डोक्यात रॉड मारून खून करण्यात आल्याच प्राथमिक तपासामध्ये समोर आला आहे. आरोपी पती डॉक्टर अनिल राहुले हा रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे.डॉ अनिल यांनी शनिवारी सायंकाळी नागपुरात आल्यावर अर्चना याचा मृतदेह दिसल्याचा दावा केला होता.. मात्र पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता अनिल हा मागील चार ते पाच महिन्यापासून अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्याच्यावर सोबत वाद घालायचा अशी माहिती समोर आली आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 17 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.