नवी मुंबईतील रबाळे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबध ठेवले. हा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, ती 21 आठवड्यांची गरोदर असल्याचे समजले आहे. या प्रकरणातील आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडित मुलगी आणि आरोपी एकाच वर्गात शिकत होते. त्या दोघांमध्ये प्रेम झाले. आरोपीने मुलीला लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबध निर्माण झाले. काही दिवसानंतर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला तिची आई दवाखान्यात घेऊन गेली. तपासणी केली असता, मुलगी 21 आठवड्यांची गरोदर असल्याचे समजले आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीच्या कुटुंबासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक होती. मुलीच्या आईची तर पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.