Crime

नवाब मालिकांचे ट्विट ‘यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’

Published by : Lokshahi News

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सध्या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या रडारवर असल्याचंच चित्र दिसत आहे. नवाब मलिक सतत ट्विटरवरून समीर वानखेडेना टार्गेट करत आहेत. मात्र आताा नवाब मलिक यांनी मध्यरात्रीची वेळ साधत समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्वीट केला असून त्यासोबत वानखेडे यांना सवालही केला आहे.

मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसत आहे. मात्र त्याबाबत फोड न करता मलिक यांनी फोटोवरूनच सवाल केला आहे. 'कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असे प्रश्नार्थक ट्वीट या फोटोसह मलिक यांनी केले आहे. या फोटोवर मलिक हे सोमवारी अधिक स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता असून त्यावर वानखेडे हे कोणते म्हणणे मांडतात हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा