सध्या प्रेम संबंधातून होणाऱ्या अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. पालघरमधून एक धक्कादायक घडली आहे. पालघर जिल्ह्यात एका नेपाळी तरुणाने त्याच्या लिव्ह- इन पार्टनरची हत्या केली. पीडित मुलगी तिच्या प्रियकराला लग्नासाठी दबाब आणल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने त्याच्या वडिलाच्या मित्राच्या साथीदाराने पीडित मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह एका गोणीत भरुन नदीत फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून तीन आरोपींना अटक केली आहे
नेमंक प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काजोल गुप्ता आणि राजकुमार वरही (वय 24) हे नेपाळ येथीस मूळचे राहिवाशी असून दोघांमध्ये प्रेमसंबध होते. काजोल ही राजकुमारच्या मागे लग्नसाठी तगा लावत होती. ज्यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागला. राजकुमारने काजोलच्या हत्येचा कट शिजवला. राजकुमारने त्याच्या वडिलांचा सिलवासा येथे राहणाऱ्या मित्र सुरेश सिंग (वय 50) आणि वाहनचालक बालाजी वाघमारे (वय 34) या दोघांच्या मदतीने काजोलची हत्या करण्याचे षडयंत्र रचले.
राजकुमारने काजोलला फिरण्याच्या नावाखाली नेपाळमधून सिलवासा येथे घेऊन आला. त्यानंतर वडील आणि त्यांच्या मित्राच्या साथीने पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात आणि नाशिक येथील त्रंबकेश्वर परिसरात पीडितेला फिरवले. नाशिक येथील परत येत असताना मोखाडा येथील जंगलात काजोलचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह एका गोणीत भरला. त्यानंतर नाशिक मार्गावरील घाटकपाडा गावाच्या नदीत फेकून दिला.
१ एप्रिल रोजी पालघरमधील मोखाडा परिसरातील वाघ नदीत एका महिलेचा मृतदेह पोत्यात सापडला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळेस त्या पोत्यावर SM28 लिहिलेले होते. त्या नंबरच्या आधारित पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. हा नंबर वाटाणे घेऊन जाणाऱ्या होलसेल बाजारातील असल्याचे समोर आले. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना सदर प्रकरणातील तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.