Crime

Baramati : बारामतीतील बँक मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीत शेवटची भावना व्यक्त, "मृत्यूनंतर..."

बारामती शहरातील 'बँक ऑफ बडोदा' शाखेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ बँक व्यवस्थापकाने स्वतःचा जीव दिल्याचं वृत्त हाती आलं आहे.

Published by : Team Lokshahi

बारामती शहरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भिगवण रस्त्यावरील 'बँक ऑफ बडोदा' शाखेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ बँक व्यवस्थापकाने स्वतःचा जीव घेतल्याचं वृत्त हाती आलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा, शाखेतच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बँकिंग क्षेत्रातील कामाच्या दबावावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मृत व्यक्तीची ओळख शिवशंकर मित्रा (वय 45) अशी असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी होते. अनेक वर्षांपासून ते बारामती येथे बँक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे की, बँकेच्या कामाचा सततचा ताण सहन होत नसल्यामुळे त्यांनी ही टोकाची कृती केली. त्यांनी आपल्या कुटुंबाचा या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करत, पत्नी व मुलीची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूनंतर दोन्ही डोळ्यांचे दान करण्याची इच्छा त्यांनी या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर मित्रा हे गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला होता, परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. सततचा कामाचा बोजा व वरिष्ठांकडून होणारा दबाव यामुळे ते अधिकच अस्वस्थ झाले होते. अखेर त्यांनी आत्महत्येसारखा निर्णय घेतला.

त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केवळ व्यथा नव्हे तर एक सामाजिक संदेशही होता — 'कृपया कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव टाकू नका. प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतो.' त्यांच्या या भावनिक अपीलने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर बारामती शहरात शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत बँक कर्मचाऱ्यांवरील तणावाचा गंभीर विचार करण्याची गरज असल्याचं नमूद केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा