Crime

Mumbai Sakinaka Rape | मुंबईत ‘निर्भया’ची पुनरावृत्ती; अत्याचार झालेल्या पीडित महिलेचा मृत्यू

Published by : Lokshahi News

मुंबईत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याची धक्कादायक घडना 10 सप्टेंबरला घडली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. दिल्लीत २०१२ साली घडलेल्या 'निर्भया' प्रकरणाची आठवण देणारी क्रूर घटना आहे. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरोपीनं एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर एक व्यक्ती महिलेला मारहाण करीत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या सुमारास करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि गुप्तांगात लोखंडी रॉड घालण्यात आल्याचे आढळले. अखेर या महिलेचा मृत्यू झाला.

नराधम आरोपी मोहन चौहान

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप