Crime

Chhatrapati Sambhajinagar : लिफ्ट देणं पडलं महागात, 15,000 रोकड लंपास; नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर: लिफ्ट देण्याच्या निर्णयामुळे 15,000 रोकड चोरी; पोलिसांचे नागरिकांना माणुसकी जपण्यासह सावधानतेचे आवाहन.

Published by : Team Lokshahi

माणुसकीच्या नात्याचा एका तरुणाने महागात पडला आहे. मला फक्त तिसगाव चौफुलीपर्यंत सोड ना भाऊ... मी गरीब आहे, असे बोलत तरुणाच्या खिशातून मोबाईल आणि रोकड लंपास केली. छत्रपती संभाजीनगर Chhatrapati SambhajiNagar मधील वाळूज एमआयडीसी परिसरात सदर प्रकार घडला. या प्रकरणामुळे आजू-बाजूच्या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

शुभम मनोहर बनकर हे दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात युवकाने रस्त्यात थांबवले. तो म्हणाला, "माझ्याकडे पैसे नाहीत, अर्जंट तिसगाव चौफुलीपर्यंत सोड, उपकार होईल!" शुभम यांनी माणुसकीने लिफ्ट दिली. पण हाच निर्णय महागात पडला! काही अंतरावर पोहोचताच इसमाने उतरण्याची विनंती केली. क्षणार्धात गायब झाला. थोड्याच वेळात शुभम यांनी खिशात हात घातला, तर मोबाईल आणि खिशातून एकूण १५,००० रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू असून चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन:

अनोळखी व्यक्तीस लिफ्ट देण्यापूर्वी शक्य असल्यास फोटो काढा

वाहनात कॅमेरा असल्यास रेकॉर्डिंग सुरू ठेवा

संशयास्पद वर्तन दिसल्यास लगेच पोलिसांशी संपर्क साधा

"माणुसकी जपा... पण डोळे उघडे ठेवा!"

लिफ्टच्या नावाखाली लुटणाऱ्यांपासून सावध राहा. तुमचा क्षणभराचा विश्वास तुमच्यासाठी आर्थिक व मानसिक धक्का ठरू शकतो!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा