दादरा – नगरहवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत दाखल करण्यात आलेल्या गुन्हा रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.
मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा – नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सिल्व्हासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनी दाखल केली आहे. राजकीय दबावामुऴे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आऱोप याचिकेत करण्यात आला असून परमबीर सिंह यांच्या आरोपांचा याचिकेत दाखला देण्यात आला आहे.