राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केलं त्यांनतर पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याआधी वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे, त्याची आई लता हगवणे, बहीण करिष्मा हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, मयत वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर व्रण आहेत.
यापूर्वी अटक केलेल्या आरोपी आणि राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची एकत्रित चौकशी करणे बाकी आहे. वैष्णवी यांना स्त्री धन म्हणून मिळालेल्या सोने तारण ठेवून घेतलेल्या पैशांचे नक्की काय केले. आरोपींचा आर्थिक व्यवहार तपासायचा आहे. घटना घडल्यानंतर आरोपी कुठे पळून गेले होते, त्यांना कोणी आश्रय दिला, याबाबत चौकशी करायची आहे हगवणे पळून गेले ते वाहन जप्त करून त्याची देखील तपासणी करायची आहे. abetment of suicide या अन्वये हा गुन्हा दाखल केला असल्यामुळे गंभीर प्रकरण आहे