Crime

Satara Doctor Suicide Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं राजकीय कनेक्शन! आतेभावाचा खळबळजनक खुलासा; तिच्यावर दबाव टाकणारे 'ते' खासदार कोण?

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटवल्या आहेत.

Published by : Prachi Nate

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटवल्या आहेत. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपल्या तळहातावर सात ओळींचा संदेश लिहून दोन पोलिस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या घटनेची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मात्र आता या प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या भावाने आरोप केला आहे की, “माझ्या बहिणीच्या प्रकरणात राजकीय दबाव टाकण्यात आला. एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी चार-पाच तास विलंब केला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास साडेतीन तासांहून अधिक वेळ लावला.” त्यांचा दावा आहे की, “खासदारांच्या पीएच्या फोनवरून रिपोर्ट बदलण्यास सांगण्यात आले होते.”

डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या मते, मृत डॉक्टरने याआधी काही अर्ज आणि तक्रारी दिल्या होत्या, ज्यांच्या प्रती आता त्यांच्या कुटुंबाकडे आहेत. त्या तक्रारीत एका खासदाराच्या पीएचा आणि काही पोलिस अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. यात एसपी महाडिक, पोलीस निरीक्षक गोपाल भरणे आणि प्रशांत बनकर यांची नावे आल्याचेही त्यांनी उघड केले.

डॉक्टरच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे. “माझ्या लेकराला त्रास देणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या,” अशी भावनिक मागणी मृत डॉक्टरच्या आईने केली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा