Crime

Pune Crime : धक्कादायक ! पत्नीचा खून करून मृतदेह नेला दुचाकीवरुन, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह दुचाकीवरून नेत असताना पोलिसांच्या हाती लागला.

Published by : Shamal Sawant

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात बुधवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह दुचाकीवरून नेत असताना पोलिसांच्या हाती लागला. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही घटना नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री अंदाजे 1:30 च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे नाव बबिता राकेश निसार असून तिचा पती राकेश रामनायक निसार याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.

खून केल्यानंतर राकेशने मृतदेह दुचाकीवर बसवून भूमकर पुलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जात असताना, आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकांनी त्याला संशयावरून थांबवले. त्याची चौकशी केली असता, खून उघड झाला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

राकेशने नेमका हा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून नांदेड सिटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपीचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, घरातील नातेसंबंध आणि अन्य संबंधित बाबींची तपासणी केली जात आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून लोकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मृतदेह घेऊन जाण्याचा प्रकार ऐकून स्थानिक नागरिक हादरले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या