सध्या संपूर्ण महाराष्ट्र वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने हादरला आहे. या प्रकरणी आता आरोपींवर कारवाई झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. अशातच आता चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपी नीलेश चव्हाणला काल नेपाळमधून ताब्यात घेतले. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. मध्ये निलेशच्या घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल जप्त करण्यात आले. तर निलेशचा एक लॅपटॉपही पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच निलेशचा पासपोर्ट आणि पिस्तुलीचा परवानाही पोलिसानी जप्त केला आहे.
पोलिसांनी नीलेशच्या घराची झडती घेतली असता अनेक संशयास्पद वस्तु हाती लागल्या आहेत. यामध्ये त्याच्या तिजोरीत ठेवलेले शशांक, लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या मोबाईलच्या माध्यमातून वैष्णवी हगवणेच्या संबंधित काही चॅट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. तसेच आता निलेशला 3 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीच्या छळामागे काय कट होता, याचा तपास पोलिसांना करायचा आहे.