सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर विविध चर्चादेखील सुरु आहेत. अशातच आता हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या बाबतीत धक्कादायक वक्तव्य केले आहे. सुनावणीदरम्यान राजेंद्र हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी धक्कादायक दावे केले आहे. यामुळे आता वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर चर्चा होत आहे. तिने दुसऱ्या कुणामुळे आत्महत्या केली असा दावा करण्यात आला आहे.
त्यांनी कोर्टात सांगितले की, वैष्णवी दुसऱ्या एका व्यक्तीशी चॅट करत होती. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा. म्हणून तिने आत्महत्या केली असावी, असा दावा त्यांनी कोर्टात केला आहे. आम्ही वैष्णवीचे चॅट उघड करु शकतो, असेही हगवणेचे वकील म्हणाले आहेत.