Crime

Pune Crime : दंडाला चावा, जबरदस्तीने शरीरसंबंध, 'ते' फोटो वडिलांना पाठवत केली 50 लाखांची मागणी, धक्कादायक प्रकार उघड

आरोपीने मुलीबरोबर शारीरिक संबंधदेखील ठेवले आणि त्याचबरोबर 50 लाख रुपयांची मागणीदेखील केली.

Published by : Shamal Sawant

सध्या एकतर्फी प्रेमातून अनेक भयंकर प्रकार समोर येत आहेत. अनेकजण प्रेमातून अनेकदा टोकाचं पाऊल उचललं जातं. पुण्यामध्ये कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणाने जबरदस्तीने लग्न करण्याच्या उद्देशाने पीडितेला खूप त्रास दिला. याबरोबरच पीडितेकडे 50 लाख रुपयांची मागणीदेखील केली मात्र ही रक्कम न दिल्याने सादर मुलीला शीवीगाळ आणि मारहाण केली आणि त्याचबरोबर तिचे काही फोटो तिच्या वडिलांनादेखील पाठवले.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना खूप कालावधीपासून एकमेकांना ओळखत होते. आरोपीने मुलीबरोबर शारीरिक संबंधदेखील ठेवले आणि त्याचबरोबर 50 लाख रुपयांची मागणीदेखील केली. मात्र पैसे न दिल्याने आरोपीने पीडितेला शिवीगाळ, मारहाण केली, शरीराला चावा घेतला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि मंदिरात घेण गेला आणि लग्न केले.

त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे पीडितेला धमकावत तिचे नग्न फोटो काढले आणि वडिलांना पाठवले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आता या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी रोहित कांबळे विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने इतका टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तरुणींनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सतर्क राहण्यास सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता गेल्या वर्षभरापासून हा त्रास सहन करत होती. मात्र त्रास असह्य झाल्याने तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची कमाई वाढण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Pune Ganpati Visarjan 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्याची विसर्जन मिरवणूक संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'निरोप घेतो आता आज्ञा असावी..., 33 तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न