आज जागतिक महिला दिन आहे, जितका तो तुझ्यासाठी खास आहे तितकाच तो संपुर्ण मानव जातीसाठी खास आहे. कारण, तुच खरी वंशवेल आहेस. तुझ्यापासूनच खरी वंशवृद्धी सुरु होते. एका स्त्रीने ठरवल तर ती काय नाही करु शकत. पण आज महिला दिन असताना अहिल्यानगरमधून एक काळीज पिळगटवणारी बातमी समोर आली आहे. तेच अहिल्यानगर ज्याचे नाव पुण्यश्री अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ठेवण्यात आलं.
तर ही बातमी सायली चंद्रकांत परब हिची, सायली च्या वडीलांची सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांची सतत बदली होत रहायची. त्यामुळे तिच शिक्षण कधी मुंबईत झाल तर कधी पुण्यात झाल. तिच पुढचं डॉक्टरचं शिक्षण घेण्यासाठी सायली बंगळूरुला गेली. तिथे तिची ओळख सुशील कबाडी या इस्मानाशी झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. 2013 मध्ये कोकणातील या चेडूची लग्नगाठ अहिल्यानगरच्या सुशील कबाडीशी बांधली गेली.
लग्नाच्यावेळी सुशीलच्या घरच्यांकडून हुंड्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्यावेळेस सायलीची आई कर्करोगाला सामोरी जात होती. त्यामुळे तिच्या वडीलांची त्यांना काही काळाने हुंडा पुरवला. अस असताना हसती खेळती राहणारी सायली 7 फेब्रुवारीला मात्र कायमची शांत झाली. सायली सोबत नेमक असं काय घडल ? हे सांगताना सायलीच्या बाबांना देखील अश्रू अनावर झाले. काय म्हणाले सायलीचे वडील जाणून घेण्यासाठी पाहा लोकशाही मराठीची बातमी.