Crime

मुख्याध्यापकाचा विद्यार्थ्याला बॅड टच, रडत घरी गेल्याने घटना उघडकीस

Published by : Team Lokshahi

विद्यार्थ्यांना शाळेत गुड टच, बॅड टच शिकवावे असंख्य अनेक शाळेत बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात अशा गोष्टी शिकवल्या जातात की नाही मोठा प्रश्न आहे. कारण क्वचित अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे अशा लैगिक छळीच्या घटना उघडकीस येतील. अमरावतीतही (Amaravati) अशीच घटना घडली आहे. या प्रकरणात आता मुख्याध्यापकाला (headmaster) अटक करण्यात आले आहे.

अमरावती शहरातील नामांकित दिल्ली पब्लिक स्कुल (Delhi Public School) इंग्रजी शाळेतील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने (headmaster) सहा वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतच केस कापून बॅड टच (Bad touch) केल्याची बाब समोर आली आहे. इंग्रजी शाळेत पहिल्या वर्गात शिकणारा सहा वर्षाचा चिमुकला सोमवारी (दि. २१) शाळेत गेला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्याला त्यांच्या कार्यालयात बोलावून त्याच्या डोक्याचे केस कापले. ही घटनी मुलगा रडत रडत गेल्याने उघडकीस आली. ही बाब माहीत पडताच मुलासोबत घडलेल्या अश्लील घटनेचा जाब विचारणाऱ्या वडिलालाही मुख्याध्यापका कडून शिवीगाळ करण्यात आली. तसेच ही शाळा कुणाची आहे हे तुला माहीत नाही अशी धमकीही मुख्याध्यापकाने दिली होती. या प्रकरणी मुख्याध्यापकाच्या (headmaster) या कृत्याप्रकरणी पोलिसात तक्रार नोदवण्यात आली असुन मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा