NALASOPARA SHOCKER: 30-YEAR-OLD MAN FOUND DEAD IN LOCKED FLAT, POLICE PROBE ON 
Crime

Nallasopara Crime: नालासोपाऱ्यात इमारतीतील फ्लॅटमध्ये आढळला 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Police Investigation: नालासोपारा पूर्वेतील शिवम निवास इमारतीतील फ्लॅटमध्ये ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस आला.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

नालासोपारा पूर्वेतील महेश पार्क परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शिवम निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक ३०९ मध्ये एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव हिरेन महेंद्र चित्तौडा असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लॅट क्रमांक ३०९ मधून तीव्र आणि दुर्गंधीयुक्त वास येऊ लागल्याने इमारतीतील रहिवाशांना संशय आला. त्यानंतर त्यांनी परिसरात राहणाऱ्या मृतकाच्या बहिणीला तसेच माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने तुलिंज पोलीस ठाण्याला कळवण्यात आले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आतमध्ये हिरेन याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला, हे दृश्य पाहून पोलीसही हादरले.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन हा आपल्या आईसोबत राहत होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याची आई गुजरातमधील त्यांच्या मूळ गावी गेली होती. हिरेन आजारपणाने त्रस्त होता तसेच त्याला व्यसनाधीनतेची सवयही होती, अशी माहिती समोर आली आहे.

सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी तुलिंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

• नालासोपारा पूर्वेतील फ्लॅटमध्ये ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला
• दुर्गंधीमुळे रहिवाशांना संशय; पोलिसांना माहिती
• घर आतून बंद, दरवाजा तोडून पोलिसांचा प्रवेश
• शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा