नातेवाईकांना पेन्शन दिल्या कारणाने पोटच्या मुलानेच आईला कुकरणे मारल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस झाली आहे. स्वतःच्या मुलानेच आईला बेदम मारहाण केल्याची घटना सोलापुरातील अन्नपूर्णा संकुल अपार्टमेंट येथे घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुलाला घेतले आहे. विजयालक्ष्मी चिंचणपुरे असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे. तर या प्रकरणी मुलगा हर्षल चिंचणपुरे या संशयित आरोपीला जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित आरोपी हर्षल चींचणपुरे हा शिक्षण विभागात लिपिक म्हणून कामाला आहे. अटक करून पोलिसांनी हर्षल चिंचणपुरे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.