Crime

Nanded Crime : नांदेडमधील गोळीबार प्रकरण; गोळीबार करणाऱ्या दोघांना एटीएसकडून पंजाबमध्ये अटक

नांदेडमधील गोळीबार प्रकरणात एटीएस पथकाने पंजाबमध्ये धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि एकजण जखमी झाला. पोलिसांचा अंदाज आहे की आरोपी खालसा दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.

Published by : Team Lokshahi

नाांदेडमधील अबजल येथे गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले होते. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर, एकजण जखमी झाला होता. आरोपींचा खालसा दहशतवादी संघटनेशी संबध असल्याचा पोलिसांना संशय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांना एटीएस पथकाकडून पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे.

नेमंक प्रकरण काय?

मिळलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहिदपुरा भागात रवींद्रसिंग राठोड आणि गुरमीतसिंग सेवालाल उभे असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात रवींद्रसिंघ राठोडचा जागीच मृत्यू झाला, तर गुरमीतसिंघ सेवालाल हा जखमी झाला होता. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपींचा खालसा दहशतवादी संघटनेशी संबध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने पंजाबमध्ये धडक कारवाई करत मुख्यआरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा