Crime

Pune Crime News: चारित्र्यावर संशय, मित्राच्या साथीने पत्नीला संपवलं, पण... समोर आलं कारण

पुणे क्राइम: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या केली, पण तीन महिन्यानंतर उलगडा झाला.

Published by : Prachi Nate

पति-पत्नीचं नात हे विश्वासाच्या जोरावर चालणार पवित्र नात आहे. या नात दोघांच्याही संमतीने जोडलं जात त्यामुळे या नात्यात एकमेकांचा विश्वास आणि एकमेकांवरील प्रेम महत्त्वाचं असतं. अस असताना सध्या देशभरात कुठून-कुठून पति-पत्नीच्या वादाचं रुपांतर हे हत्येत होताना दिसत आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे घडली आहे. मात्र इथे पतिने पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकुगाव ते परधाडी घाटात टाकून दिला. याचा उलघडा तब्बल तीन महिन्यानंतर झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे 26 वर्षीय विवाहित महिला प्रियंका जोतीराम करे ही 29 जानेवारी 2025 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार स्वतः तिच्या पतिने जोतीराम आबा करे याने इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. त्यादरम्यान पोलिस हवालदार सुधीर भिमराव काळे यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 27 जानेवारी 2025 रोजी जोतीराम आबा करे व दत्तात्रय शिवाजी गोलांडे रात्री 10च्या सुमारास प्रियंका जोतीराम करेंच्या घरी गेले.

पती जोतीराम आबा करेसह पतीचा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे हे तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे वागणे बरोबर नसल्याचं म्हणू लागले. तसेच तिच्या वागण्यामुळे त्यांची नातेवाईकांमध्ये आणि जनमाणसात बदनामी होत असल्याच म्हणू लागले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी दोघांनी मिळून एम. एच.14 डी ए 8972 या चारचाकी वाहनात तिचा मृतदेह टाकला आणि 28 जानेवारी 2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मौजे ढेकुगाव ते परधाडी घाटात निर्जनस्थळी सकाळी 5 च्या सुमारास टाकून दिला.

एवढचं नाही तर कोणाला संशय येऊ नये यासाठी पुरावे देखील नष्ट केले. यादरम्यान आरोपी जोतीराम आबा करे आणि दत्तात्रय शिवाजी गोलांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांच्याकडून सुरु आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत