Crime

व्हिडीओ गेम पार्लरच्या डावावर लागले युवकाचे आयुष्य; पैसे हरल्याने नैराश्यातून केले विष प्राशन

Published by : Lokshahi News

गोपाल व्यास | वाशिम | आजच्या अत्याधुनिक दुनियेत कोणीही एकाच रात्री मालामाल होऊन धनदांडग्यांच्या पंक्तीत बसण्यासाठी ब्लफमास्टर होऊ पाहतो. यासाठी, वाशिमच्या कारंजा तालुका स्तरावर सुद्धा काही लोकांनी व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली आपली दुकानदारी थाटून नागरीकांच्या खिशाला कात्री लावण्याचा केविलवाणा प्रकार चालू केला आहे. तर, काही नागरिकसुद्धा रुपयाला दहा रुपये याप्रमाणे, आपण सुद्धा पैशाच्या या डावात मालामाल कसे होऊ या आशेवर स्थानिक व्हिडीओ गेम पार्लरच्या प्रलोभनाला बळी पडून इलेक्ट्रॉनिक्स मशीनवर कॉईन्सच्या माध्यमातून वरली-मटका प्रमाणे आकडेमोड करीत दामदुप्पट पैसे कमविण्याच्या नादात आपली रोजची मिळकत डावावर लावून कंगाल होतात. मात्र, कारंजा येथील स्थानिक गवळीपुरा येथील रहिवाशी युवकाने आपली रोजची मिळकत या व्हिडीओ गेम पार्लर मध्ये हरल्याने या नैराश्यातून आपले आयुष्यच या व्हिडीओ गेम पार्लरच्या डावावर लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कारंजा शहरातील स्थानिक शिवाजी नगर परिसरातील हनुमान मंदीर समोरील संकुल येथे स्थित राधाकृष्ण व्हिडिओ गेम पार्लर मध्ये लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मशीनवर आपले नशीब आजमविण्यासाठी गवळीपुरा येथील युवक येऊन कॉईन्सच्या माध्यमातून आकडेमोड करीत डावावर खेळत असतांना आपली रोजची मिळकत सुद्धा हातची गेल्याने त्याने नैराश्यातून सदरहू ठिकाणीच विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदरहू प्रकरण दुकान मालक कृष्णा देशमुख यांनी दाबण्याचा प्रयत्न करुन सदरहू प्रकरण महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या मनोरंजन विभाग शिवाय पोलीस विभागाच्या दालनात जाऊ नये याकरिता, युवकाला दवाखान्यात नेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कागद शासन मान्यतेचा मात्र कारभार अमान्यतेचा कारंजा शहरात मनोरंजनाच्या नावाखाली शासन मान्यता प्राप्त अनेक व्हिडिओ गेम पार्लर अनुज्ञप्ती उदयास आल्या आहेत. यामध्ये, शासनाने या अनुज्ञप्तीला परवाने बहाल करताना अनेक निकषांचे जाळे विणले आहे. मात्र, या अनुज्ञप्तीच्या नावाखाली अनेक मालक अवैधरित्या काम करीत असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. अशा या आयुष्याचे डाव उध्वस्त करणाऱ्या व्हिडिओ गेम पार्लरचे परवाने रद्द करण्यात यावे. अशी मागणी जोर धरत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक