जळगाव शहरातील पिंप्राळा रस्त्यावरील एका मॉलमध्ये '03 डे' स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. डमी ग्राहक पाठवून करण्यात आलेल्या कारवाईत 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू जाट याला अटक झाली असून, मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्पा सेंटरच्या बोर्डवर "भारत सरकारच्या मान्यतेने" असा उल्लेख असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. संबंधित आरोपी आणि पीडित महिला हे परप्रांतीय असल्याचंही स्पष्ट झालंय. पोलिसांच्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.