Crime

Badlapur: शिक्षकच बनला राक्षस! सातवीतल्या विद्यार्थीनीवर तीन वर्षे अत्याचार, बदलापूर पुन्हा हादरलं...

बदलापूरमधील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर तीन वर्षांचा अत्याचार उघड

Published by : Team Lokshahi

बदलापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. बदलापूरमधील एका खाजगी शाळेमध्ये शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. आरोपी शिक्षक हा पीडित, मुलीसोबत मागील ३ वर्ष विनयभंग करत असल्याचे समजले आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकास ताब्यात घेतले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

बदलापूरमधील एका खाजगी शाळेमध्ये विद्यार्थींनीसोबत ३ वर्ष विनयभंग करत होता, अशी तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांकडे नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी शिक्षक पीडित, मुलीला तिच्या आईवरुन अश्लील टिप्पणी करत होता. पीडित मुलगी मानसिक तणावाखाली असल्याने ती अचानक आजारी पडली, रुग्ण्यालयात घेऊ गेले असता, हा घडलेला सर्व प्रकार समोर आला.

पीडित मुलीच्या आईने हा सर्व प्रकाराबद्दल महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांना माहिती दिली. पीडितेच्या आईने आणि शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या कार्यकर्तांनी शाळेला जाब विचारला आहे. या दरम्यान बदलापूर पश्चिम पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा