Crime

फेसबुक लाईव्ह करत हॉटेलच्या टेरेसवरून वेटरने मारली उडी

Published by : Lokshahi News

पुण्यामध्ये मुंढवा परिसरातील पेंटहाऊस हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरुन एका वेटरने उडी मारून आत्महत्या केली, फेसबुक लाइव्ह करून त्याने आत्हात्याचे कारण सांगितले. अरविंदसिंह राठोड वय २६, रा. सनेती, उत्तराखंड असे आत्महत्या केलेल्या वेटरचं नाव आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

अरविंदसिंह राठोड हा मूळचा राहणार उत्तराखंड तो महिन्याभरापूर्वीच मुंढवा येथील हॉटेल पेंट हाऊसमध्ये कामाला लागला होता. त्या कामामध्ये त्याला खूप त्रास सहन करावा लागला. म्हणूनच त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास अरविंदसिंह राठोड हा हॉटेलच्या १३ व्या मजल्यावर टेरेसवर गेला आणि फेसबुक लाइव्ह केलं, आणि त्या लाइव्हमध्ये तो म्हणत होता "मी आत्महत्या करणार असून हॉटेलमधील काही व्यक्तींनी माझं वाईट केले आहे. फसवून माझ्याकडून काही काम करुन घेतले आहे," त्यानंतर त्याला लाइव्ह बघून अनेकांनी फोन करून रोखण्याचा प्रयत्न केले. पण अरविंदसिंह याने काही क्षणातच खाली उडी घेतली, आणि अरविंदसिंहचा जागीच मृत्यू झाला असून पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा