सध्या प्रेमप्रकरणासंबंधी अनेक बातम्या कानावर पडतात. त्याचसोबत त्या दोन व्यक्तीमध्ये होणाऱ्या वाद- विवादामुळे अनेक घटना घडतात. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिममध्ये एका तरुणीने व्हिडिओ बनवत आपला जीव संपवला आहे.
तरुणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. यादरम्यान त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. त्यामुळे तरुणी तिच्या प्रियकरापासून गर्भवती राहिली होती. पण नंतर प्रियकराने तिला टाळण्यास सुरुवात करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तिला नैराश्य आले, या नैराश्यामधून तिने गाळफास लावून आपला जीव संपवला. याप्रकरणी तपासदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, मृत तरुणी ही याआधी सुद्धा तिच्या प्रियकरापासून गर्भवती राहिली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.