Crime

Kalyan Crime : कल्याणमधील मारहाण प्रकरणाला नवीन वळण; रिसेप्शन मुलीकडून गोकुळच्या वहिनीला मारहाण

कल्याण पूर्व एका खाजगी रुग्णालयातील रिसेप्शन मराठी तरुणीला मारहाण प्रकरणाला आणखी एक नवीन वळण आलं आहे. रिसेप्शन मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Published by : Prachi Nate

कल्याण पूर्व एका खाजगी रुग्णालयातील रिसेप्शन मराठी तरुणीला मारहाण करणा परप्रांतीय आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा या दोघांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. कल्याण पूर्वमधील पिसवली गावातील रहिवासी सोनाली प्रदीप कळासरे ही श्री बाल चिकित्सालय या खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते.

क्लिनिकमधील नियमांनुसार MR सह पेशंट क्लिनिकमध्ये असताना इतर कोणालाही डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश करु शकत नाही. याच नियमांचे पालन करत ती तिचं काम करत होती. मात्र तिथे एक नशेत धुंद परप्रांतीय तरुण गोकुळ झ्या नामक थेट केबिनमध्ये घुसला, सोनालीने त्याला थांबवत 'तुम्ही जरा थांबा' असं म्हटल. त्या तरुणाने शिव्या देत धक्कादायकरीत्या पळत येऊन सोनालीच्या तोंडावर लाथ मारली आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित मुलीच्या घरी भेट घेतली. यानंतर आता या घटनेला आणखी एक वळण मिळालं आहे. यादरम्यान त्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्या रिसेप्शन मुलीने गोकुळच्या वाहिनीला मारहाण केल्याच समोर येत आहे. त्यामुळे या घटनेत एक नवीन ट्वीस्ट आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा