गुरुवारी 23 ऑक्टोबरला साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. डॉ. संपदा मुंडे असं त्या महिला डॉक्टरच नाव असून काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. ”माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. अखेर गुरुवारी रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
माजी खासदार रणजित निबाळकरांचा भाऊ आणि अजित पवारांचा आमदार सचिन कांबळे यांच्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आरोप केले आहेत. हे तिघे मिळून तिथली यंत्रणा चालवतात, चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा खळबळजनक आरोप दानवेंनी केला. तसेच महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकावरदेखील त्यांनी आरोप केला. फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे.
या घटनेने फलटण तालुक्यावर जणू काळा ठिपका उमटवल्याची भावना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी भाजपचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे गंभीर मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की, या घटनेचा तपास फॉरेन्सिक पद्धतीने, सीडीआर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व बाजूंनी करावा. निंबाळकर यांनी पुढे सांगितलं की, दोषींना ओळखून त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत
साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहत आपल्या आत्महत्येच कारण स्पष्ट केलं होत. यानंतर कालपासून सुरु झालेल्या तपासणीसंदर्भात अनेक नवीन नवीन मुद्दे समोर आले आहेत. ज्यामुळे या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. याचपार्श्वभूमिवर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल या प्रकरणावर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून, संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.