Crime

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणी तीन आरोपी अटकेत, सरकारकडून तातडीने कारवाई

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात शनिवारी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांवर पार्किंग वसुलीच्या वादातून काही गुंडांनी मारहाण केली. त्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात शनिवारी घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांवर पार्किंग वसुलीच्या वादातून काही गुंडांनी मारहाण केली. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील एक पत्रकाराची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि दंगल माजवल्याचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर आणि ऋषिकेश योगेश गांगुर्डे या तिघांना अटक केली आहे, तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे की, आरोपींनी पत्रकारांना लाथा-बुक्क्यांसह दगड व छत्रीच्या दांड्याने मारहाण केली. मंदिरासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत पार्किंग वसुलीविरोधात आवाज उठवल्याने पत्रकारांवर हल्ला झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेचा राज्यभरातून निषेध होत असून, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात आवाज उठवला आहे. “लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,” असे ते म्हणाले. पत्रकारांनी धास्ती न घेता आपले काम सुरू ठेवावे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा