Crime

वसईत दोन दुचाकींचा अपघात, दोन जखमी

Published by : Lokshahi News

संदीप गायकवाड | वसईच्या सनसिटी रोड वर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एक्टिवा स्कुटी व आर वनफाय या मोटरसायकलमध्ये धडक झाली, आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुदयवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसई पश्चिमेच्या सनसिटी रोडवरती सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. वाहन चालक मात्र त्याठिकाणी भरधाव वेगात आपली वाहने चालवतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पोलिसांनी वाहन चालकांवर बंधन आणून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी आता होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा