वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याला 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वारजे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली. निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये कस्पटे कुटुंबीयांना धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर शशांक हगवणे याला देखील 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खोटे कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्या प्रकरणी शशांक हगवणे याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.