काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम, विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
त्याने तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला, आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. कारागृहात त्रास देत असल्याचं विशालनं फोनवर सांगितल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. तर, आपला मुलगा आत्महत्या करुच शकत नाही. असा दावाही विशालच्या आईने केला आहे.
विशालच्या आई म्हणाल्या की, मला फोन आला होता त्याचा तेव्हा तो म्हणाला की, आई मला आत खुप त्रास देतात. मी त्याला बोलले की, काय त्रास देतात ते तु वकिलाला सांग. दोन दिवस गावात कार्यक्रम असल्यामुळे मी असा विचार केला की दोन दिवस जाऊ देत मग मी वकिलांसोबत बोलेन.
पुढे विशालची आई म्हणल्या की, "त्या पोलिसांनीच माझ्या मुलाला मारलं आहे. त्यांना राजकारण्यांनी खुप पैसा दिला आहे, आणि त्यांनीच माझ्या मुलाचा गळा दाबला आहे. माझ्या मुलासाठी मला न्याय पाहिजे. यांनी माझ्या मुलाला मारलं आणि आता उलटं सुलट का बोलतात. माझा मुलगा आत्महत्या करु शकत नाही, त्याला या लोकांनी मारलं आहे".
त्याचसोब त्याचे विशालचे वकील संजय धनके यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, "अक्षय शिंदेंसारखं विशाल गवळीला देखील मारलं गेलं. अक्षय शिंदेसारखं विशालला देखील मारतील हे सांगितलं होतं. कोर्टाला पोलीस प्रोटेक्शनही द्यायला सांगितलं होतं. विशाल गवळीला मारलं गेलं", वकिलांनी संशय व्यक्त केला.