Crime

ओला कार चालकाच्या हत्येच्या उलगडा, घटस्फोट देत नसल्याने पत्नीनेच प्रियकरासोबत काढला काटा

Published by : Lokshahi News

भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून कार चालकाची हत्या केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर पत्नीच्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरा सोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नव्हता. या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी फिर्यादी 32 रा. कणेरी, प्रियकर नितेश गोवर्धन वाला 28 रा.भादवड तसेच मैत्रीण प्रिया सुहास निकम 32 रा. वेताळपाडा असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे जण फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करत आहेत .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता