Crime

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये महिलेवर चाकूने हल्ला; पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात !

अंबरनाथमध्ये भर दिवसा महिलेची चाकूने हत्या; आरोपी राहुल भिंगारकर पोलिसांच्या ताब्यात, आर्थिक वादातून हत्या केल्याची माहिती

Published by : Prachi Nate
  • अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणारा पोलिसांच्या ताब्यात

  • पोलिसांकडून अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू

  • आर्थिक वादातून हत्या केल्याची पोलिसांची माहिती

अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हुतात्मा चौकाकडून स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर ही घटना घडली. पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिथून पळ काढला. यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या महिलेला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतलं. अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल भिंगारकर असं त्याचं नाव असून आर्थिक वादातून त्याने महिलेची हत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे

नेमकी घटना काय घडली?

अंबरनाथ पूर्वेतील उड्डाणपुलाच्या बाजूला भीम नगरकडे, साईबाबा मंदिराच्या शेजारील पायऱ्यांवर एक महिला आणि पुरुष असे दोघे बोलत बसलेले असतानाच अचानक त्यांच्यात वाद झाला आणि पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिथून पळ काढला. यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या महिलेला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत, हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी राहुल ताब्यात घेतलं आहे. त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सीमा कांबळे या ४२ वर्षीय मृत महिलेसोबत राहुल याचे आर्थिक देवाण-घेवाणीचे संबंध होते आणि त्यातूनच त्यांनी ही हत्या केल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा