थोडक्यात
नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात घडली घटना
तीन ते चार जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करत केला खून
दांडिया खेळण्यावरून झाला होता वाद यात कृष्णा ठाकरे या युवकाचा झाला मृत्यू
(Nashik Crime ) नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत असून मध्यरात्री एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
तीन ते चार जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. दांडिया खेळण्यावरून वाद झाला होता आणि या वादातून कृष्णा ठाकरे या युवकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर नाशिकरोड पोलिसांकडून तात्काळ छडा लावत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनं नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात खळबळ उडाली आहे.