नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत असून बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्चिंग केल्यावर बिबट्या सापडला नाही.
कर्जतहून मुंबईकडे आणि मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालीये. वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या ऑटोमॅटिक पद्धतीने थांबत आहेत. त्यामुळे बदलापूरहून कर्जत कडे जाणाऱ्या लोकल रखडले आहेत. त्याचा परिणाम अप दिशेकडील वाहतुकीवरही होतोय. दोन्ही दिशेकडील वाहतूक खोळंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा पुन्हा फटका बसलाय
आज अधिवेशनाचा 3 रा दिवस असून पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार. आज सकाळी विधानसभा अध्यक्षांना अहवाल विधिमंडळ सुरक्षा यंत्रणेकडून अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती