पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याला धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बाबुराव चांदेरे आणि समीर चांदेरे यांनी मिळून शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आले आहे.
मुंबई महापालिका शौचालयांमध्ये अनेकदा अस्वच्छता आणि अपुऱ्या सोयीसुविधा पाहायला मिळतात. असे असताना आता एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. रे रोड परिसरात महिलांच्या शौचालयातच अनधिकृत रित्या संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिकच्या पंचवटीत कारचा भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मध्यरात्री 3 वाजता हा अपघात झाल्याची स्थानिकांनी माहिती दिली.
2008 मधील मनसे आंदोलनप्रकरणी आज सुनावणी होणार पार पडली . त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्र न्यायालयात दाखल झाले होते. ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणी आज राज ठाकरे प्रत्यक्ष हजर झाले होते. परप्रांतीयांच्या रेल्वे भरतीवरून मनसेने 2008 साली आंदोलन केलं होतं
मंत्री भरत गोगावले यांचा कथित व्हिडिओ काल शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी माध्यमांसमोर दाखवत गोगावले यांच्या वरती गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगावमध्ये उमटल्याचे पाहायला मिळाले
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपात जोरदार इनकमिंग सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. नालासोपारामध्ये बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक चंद्रकांत गोरीवलेंनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले असून विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार