उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची आज भेट होण्याची शक्यता असून आज दुपारनंतर शिवतीर्थावर भेट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार संपर्क करणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
कोल्हापूर येथील राजारामपुरी परिसरात गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी वाहन ताब्यात घेण्यात आले. यावेळी भारतीय बनावटीचे २५ बॉक्स विदेशी मद्यही जप्त करण्यात आले.
निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात मनसेला खिंडार पडल्याचे पाहायला मिळत असून पुण्यात प्रभाग २४ मधील मनसेच्या अनेक सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
रायगड जिल्ह्यात नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात करण्यात आलं. यानिमित्ताने अलिबागसह ठिकठिकाणच्या समुद्रकिनारी स्थानिक आणि पर्यटकांनी गर्दी केली होती.
नववर्षानिमित्त शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून गजानन महाराजांचं दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यात येत आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.