Latest Marathi News Update live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : नरेंद्र मेहता यांच्या हुकूमशाहीला कंटाळून भाजपच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Marathi Live Headlines Updates: आज शनिवारी, दिनांक 10 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, मुंबई महानगरपालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Varsha Bhasmare

Weather Alert: महाराष्ट्रात अचानक वारं फिरलं, बर्फासारखी थंडी पडणार

नव्या वर्षात हवामानात सातत्याने बदल होत असून राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई-पुण्यात कधी थंड वाऱ्यांमुळे गारवा, तर कधी पहाटे धुक्याची चादर दिसत असून काही ठिकाणी हवा बिघडल्याचे चित्र आहे. 10 जानेवारी रोजी राज्यात पावसाचा कोणताही धोका नसला, तरी सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका कायम राहणार आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागांत हवामान कोरडे असले गारठा वाढला आहे.

Udayanraje Bhosale : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने मागितली खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी, प्रकरण काय?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (OUP) इंडियाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली असून, छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकप्रकरण अखेर दोन दशकांनंतर संपुष्टात आले आहे. अमेरिकन इतिहासकार जेम्स लेन लिखित ‘Shivaji: Hindu King in Islamic India’ या पुस्तकातील काही विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या विधानांना शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाबाई यांच्याबाबत अपमानास्पद, बदनामीकारक आणि निराधार असल्याचा आरोप करण्यात आला होता. फेब्रुवारी 2003 च्या सुमारास हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. विविध संघटना आणि शिवप्रेमींनी या पुस्तकाविरोधात आंदोलनं केली होती. वाद चिघळल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एका सार्वजनिक सूचनेद्वारे पुस्तकातील काही मजकूर पडताळणी न करता प्रसिद्ध झाल्याचे मान्य केले होते. विशेषतः पृष्ठ क्रमांक 31, 33, 34 आणि 93 वरील मजकुराचा उल्लेख करत प्रेसने त्याबाबत खेद व्यक्त केला होता. त्यानंतर हे पुस्तक भारतातून मागे घेण्यात आले.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका; आज 'या' ठिकाणी होणार जाहीर

(Devendra Fadnavis ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभा घेणार आहेत. सोलापूर, पिंपरी आणि मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

Ajit Pawar - Supriya Sule : अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार; संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार

( Ajit Pawar - Supriya Sule) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. .येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचाराला जोरदार सुरूवात करण्यात आली असून पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहेत.

Published Text Raj Thackeray : 'नाशिक दत्तक घेतो म्हणणारे फडणवीस पुन्हा इथे फिरकले नाही..'तपोवनातील वृक्षतोडीवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून सर्वच पक्षांचे बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचारात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आज नाशिकमध्ये संयुक्त प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवरून हल्लाबोल केला. त्यांच्या भाषणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे.

Gadchiroli : विद्यार्थी परिषदेच्या प्रांत अधिवेशनाला सुरूवात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तीन दिवसीय विदर्भ प्रांत अधिवेशनाला आजपासून गडचिरोलीत सुरूवात झाली. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.वीरेंद्र सोलंकी, आमदार डॅा.मिलिंद नरोटे होते. यावेळी पॅरा आॅलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या दिव्यांग नेमबाज श्वेता कोवे हिचा सत्कारही करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे आवाहन यावेळी मंत्री उईके यांनी केले.

Akola :अकोला महापालिकेच्या परवानगीवरून गोंधळ; उमेदवार आक्रमक, निवडणूक विभागावर आरोप..

अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध राजकीय पक्षांकडून जाहीर सभांचा धडाका सुरू आहे. मात्र प्रचारासाठी महापालिकेची परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने आता वाद निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक ९ (अ) मधील उमेदवार सौरव दामोदर खंडारे व प्रभाग १२ मधील अपक्ष उमेदवार ॲड. सिद्धार्थ दंदी यांनी होल्डिंग व प्रचारासाठी परवानगी मागितली असता गेल्या दोन दिवसांपासून ती देण्यात आली नाही. यामुळे हे दोन्ही उमेदवार आज चांगलेच आक्रमक झाले. यांनी महानगरपालिके समोर प्रचार गाडीवर उभे राहून निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. या मुळे काही काळ महापालिकेसमोर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर संबंधित विभागाने परवानगी देण्याचे आश्वासन दिले.

Aditi Tatkare : 'योजना निवडणुकीसाठी नाही तर महिलांच्या प्रत्यक्ष लाभासाठी', लाडकी बहीण योजनेवर मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य

Aditi Tatkare मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. चौकसभा, जाहीर सभा, पदयात्रा आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर नेत्यांचा भर दिसून येत आहे. या प्रचाराच्या धामधुमीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या पश्चिम उपनगरात सक्रिय झाल्या असून त्यांनी आज मुंबईतील विविध भागांचा दौरा केला.

Thackeray Brothers : मनपा निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात; उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. काल नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा पार पडली. आता उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली राजकीय सभा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार असून पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार असून या सभेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Kanjurmarg Fire : कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग

कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीत शासनाची अंगणवाडी देखील आहे. इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये ही आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Khopoli Mangesh Kalokhe : खोपोलीतील मंगेश काळोखे प्रकरण; 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी, 2 आरोपींना पोलीस कोठडी

रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निघृण हत्या करण्यात आली. खोपोली नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे निवडून आल्या. मंगेश काळोखे यांच्या निघृण हत्येनंतर खोपोलीमध्ये तणावाचे वातावरण असतानाच, पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात ही हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज नाशिकमध्ये जाहीर सभा; ठाकरे बंधूंच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असून सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असून ठाकरे बंधूंच्या टीका व आरोपांना शिंदेंकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात; वरळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापणार

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात नितेश राणे यांची सभा होणार आहे. त्यामुळे आता वरळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मंत्री नितेश राणे आज सायंकाळी 6 वाजता वरळीत येणार असून वरळी बीडीडी चाळ येथे राणे प्रचार करणार आहेत. त्यामुळे आता या सभेतून नितेश राणे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Sanjay Raut : बदलापूर प्रकरणावरून राजकीय वाद पेटला; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या बहुचर्चित प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपकडून कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Gold-Silver Price : भारतात सोन्याचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे भाव...

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरांनी उच्च पातळी गाठली असून, 10 जानेवारी रोजीही बाजारात दर तुलनेने स्थिर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार, तसेच देशांतर्गत मागणी यांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल असल्याने दरांमध्ये मजबुती टिकून आहे. 10 जानेवारी रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 13,932 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. शुद्धतेच्या बाबतीत उच्च दर्जाचं मानलं जाणारं 24 कॅरेट सोनं गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पसंत केलं जातं. याच दिवशी 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 12,771 रुपये, तर दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 10,449 रुपये इतका आहे.

Thackeray Brothers : राज, उद्धव ठाकरेंची 12 तारखेला एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांच्या तोफा धडाडणार आहेत. काल नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा पार पडली. आता 12 तारखेला राज आणि उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहे. गडकरी रंगायतन चौक येथे ही सभा पार पडणार असून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Thackeray Brothers : मनपा निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात; उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. काल नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा पार पडली. आता उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली राजकीय सभा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार असून पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार असून या सभेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Baramati: बारामतीत कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन 8 दिवस होणार.

कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन 2026 यंदा 8 दिवस होणार..

17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान होणार कृषी प्रदर्शनाचे आयोजन...

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते 17 तारखेला होणार उदघाट्न....

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, रोहित पवार यांची उदघाटनाला लावणार उपस्थिती...

Goregaon: गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंगनगरमध्ये आग, घरात फ्रीजचा स्फोट होऊन लागली आग

- गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंग नगर 2 मध्ये रात्री 3 च्या सुमारास घरात फ्रीज ब्लास्ट होऊन मोठी आग लागली

- घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल होत अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवले

- मात्र या आगीत घरात झोपेत असलेले एकच घरातील 3 व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला

- या संदर्भात पुढील तपास गोरेगाव पोलीस अणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत....

Ambernath: अंबरनाथचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा

स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांचा राजीनामा

भाजपकडून करण्यात आली होती नियुक्ती

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार निर्णय

Pankaja Munde: अहिल्यानगरमध्ये मंत्री पंकजा मुंडेंची प्रचार रॅली

तपोवन रोड आणि निर्मलनगर परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन..

भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या प्रचारार्थ रोडशोचं आयोजन

रॅलीमध्ये मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे, संग्राम जगताप, सुजय विखे यांची उपस्थिती...

इम्रान प्रतापगडी यांनी घेतली हिदायत पटेल यांच्या परिवाराची भेट

अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्यानंतर या घटनेचे राजकीय पडसाद राज्यभर उमटले आहेत. या घटनेमुळे वातावरण तापले असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गढी यांच्यासह आमदार साजिद खान पठाण यांनी स्व. हिदायत पटेल यांच्या मोहाळी येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपण भेट घेतली यावेळी त्यांनी कुटुंबियांना आश्वासन देत या प्रकरणातील इतर आरोपींना तत्काळ अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली.

छत्रपती संभाजीनगरात 11 वा अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

मराठवाड्यातील रसिकांसाठी जागतिक दर्जाच्या चित्रपटांची पर्वणी ठरणारा ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.

या महोत्सवात प्रथमच भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश असून जगभरातील सुमारे ७० निवडक चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

चित्रपट निर्मिती, संवाद व पर्यटनाला चालना देणे हा महोत्सवाचा उद्देश आहे..

Latur: लातूरमध्ये 17 अपक्ष उमेदवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

लातूर मनपा निवडणुकीत 17 अपक्षांचा शिंदे गटात प्रवेश, वादाला तोंड.... पक्षप्रवेशावर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा थेट विरोध... एकनाथ शिंदेंची दिशाभूल करून प्रवेश झाल्याचा गंभीर आरोप...... स्थानिक नेतृत्वाला डावलून निर्णय घेतल्याचा दावा.... मनपा निवडणुकीआधीच शिंदे गटातील अंतर्गत कलह उघड.... लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ.....

Maharashtra Politics: मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा एकाच गाडीतून प्रवास

आज श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे वामन भाऊ यांची 50 वी सुवर्ण पुण्यतिथी आज पार पडली या कार्यक्रमाला प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आले होते तर या कार्यक्रमानिमित्त मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे आमदार सुरेश धस हे सर्वजण एकाच व्यासपीठावर एकत्र होते तर हेलिपॅड वरून मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस एकाच गाडीमध्ये प्रवास केल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत यामुळे मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात असलेलं वैर या गडावरून संपलं असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे.

Ayodhya: अयोध्येतील राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न

राम मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्थेत गडबड, नमाज पठण करताना काश्मिरी तरुणाला ताब्यात

अयोध्येतील राम मंदिर संकुलातील सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे उघडकीस आले आहे.

दक्षिण भिंतीच्या परिसरात नमाज पठण करताना एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

सूत्रांचे म्हणणे आहे की नमाज पठण करण्यापासून रोखल्यानंतर त्या तरुणाने घोषणाबाजी केली.

गुप्तचर संस्था आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, तर प्रशासन आणि ट्रस्टने मौन बाळगले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरी दिली भेट

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लिलावती देशमुख यांचे 30 डिसेंबर रोजी झाले होते निधन

सोलापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली

आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेविक किरण देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय यावेळी उवस्थित होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे हे देखील यावेळी उपस्थित होते

मोदींनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा अमेरिकेचा दावा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनी न केल्यामुळेच भारताबरोबरचा व्यापार करार होऊ शकला नाही’, असा दावा अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी एका मुलाखतीत केला. भारत-अमेरिका व्यापार करार आतापर्यंत का पूर्ण होऊ शकला नाही, याचा सविस्तर तपशील लुटनिक यांनी दिला. दरम्यान, लुटनिक यांनी केलेले विधान चुकीचे असून ट्रम्प-मोदी यांच्यात आठ वेळा चर्चा झाल्याचा दावा भारताने केला.

इराणमध्ये महागाईविरोधात 100हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका

इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका

इराणच्या 100 शहरांमध्ये महागाईविरोधात हिंसक निदर्शने

आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला

एका पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार करण्यात आला. 2270 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठाकरे बंधूंच्या सभेचा टीजर जारी

ठाकरे येतायत मराठी माणसांची एकजूट दाखवण्यासाठी

उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली राजकीय सभा पार पडणार

मुंबई रक्षणाच्या शिवगर्जनासाठी शिवशक्तीची सभा

Washim: वाशिमच्या वनोजातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकात घेतले मोहरीचे अंतर पिक

वाशीमच्या वनोजा येथील शेतकऱ्यांनी हरभरा पिकात मोहरीचे अंतर पिकं घेतले असून दोन्ही पिकं चांगलीच बहरलीयेत त्यामुळं शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. मोहरी उंच वाढते तर हरभरा खाली राहतो त्यामुळं दोन्ही पिकं एकत्र पेरली तरी जोमाने वाढतात शिवाय मोहरी पिकाला चांगले दर मिळत असल्यानं हे दुहेरी पिकं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतेय.

नीलम गोरे यांची अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर उपरोधक टीका

नीलम गोऱ्हे ऑन अजित पवार जाहीरनामा

नीलम गोरे यांची अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर उपरोधिक टीका

राजकारणात काहीही घडू शकत, अजित पवार यांचे केंद्रीय मंत्री झाले तर ते करू शकतात..

अजित पवारांनी जे काही सांगितलं ते महानगरपालिकेच्या अखत्यारीत होऊ शकणार नाही

घोषणा सुंदर आहे ,मात्र घोषणांच्या अंमलबजावणीची वेळ त्यांच्यावर येईल असं मला वाटत नाही….

अखेर तुषार आपटे यांनी दिला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा

लोकशाही मराठीने ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय,तुषार आपटे यांनी बदलापूर नगर परिषदेतील उपमुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला,त्यानंतर तो ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर केला जाईल,मात्र देशभर गाजलेल्या प्रकरणातील शाळेचे सचिव तुषार आपटे हे सह आरोपी असताना भाजपाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं कसं असा संताप बदलापूरकरांनी व्यक्त केलाय

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मालेगावला घेतली सभा

मालेगाव महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तर्फे उभे करण्यात आलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात ना काँग्रेस ना समाजवादी ना राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाची हिम्मत नाही फक्त वंचित बहुजन आघाडी या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहे.

Bhiwandi: भिवंडीत शिवसेना शिंदे गटाकडून भादवड प्रभागात जोरदार शक्तिप्रदर्शन

भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.सर्वच पक्ष प्रचारात रंगून गेले असताना भादवड,टेमघर या परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक 13 व 15 मध्ये शिवसेना कडून जोरदार प्रचार केला जात आहे. भादवड नाका याठिकाणी या विभागाचे 40 वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक तथा भिवंडी लोकसभा संपर्कसंघटक मदनबुवा नाईक यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून या प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

युती सरकारवर ओवेसींचा घणाघात,काँग्रेस नेत्यांवरही टीकेची झोड

महाराष्ट्रात सत्तेतील युती सरकारमुळे जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अकोल्यात प्रचारासाठी आयोजित सभेत केला आहे. निवडणुका आल्या की युतीतील पक्ष वेगवेगळे लढतात, मात्र निवडणुकीनंतर सत्तेसाठी सर्वजण एकत्र येतात आणि महाराष्ट्राच्या जनतेची गंमत करतात, अशी घणाघाती टीका ओवेसी यांनी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा